‘देवमाणूस’ परत येत आहे...


‘देवमाणूस’ परत येत आहे... मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ परत येत आहे. ‘देवमाणूस 2’ या मालिकेचा प्रोमो नुकताच झी मराठी वाहिनीवर दाखवण्यात आला. डॉ. अजितकुमार देव ही पाटी हटवण्यात आल्याचं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे मालिकेत नेमकं काय पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे. त्यासोबतच बाबू, सरु आजी, टोण्या, डिम्पी, वंदी आत्या, नाम्या, बजा ही पात्रं लवकरच पुन्हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. साताऱ्यातील लहानशा खेडेगावातील लोकांची फसवणूक करणाऱ्या डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग या बोगस डॉक्टरची ही कथा होती. अभिनेता किरण गायकवाड याने अजित कुमार देवची भूमिका साकारली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post