महाविकास आघाडीचा भाजपला दणका....देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा मोठा विजय

 



देगलूर : राज्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसलाय. देगलूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांचा मोठा विजय झालाय. जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यावर 41 हजार 933 मतांनी विजय मिळवला आहे. 

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांना 1 लाखापेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. तर सुभाष साबणे यांचा 41 हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसनं ही पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात लढवली. त्यामुळे चव्हाण यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरली होती. तर भाजपकडूनही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. मात्र, मतदारांवर त्याचा परिणाम दिसून आला नाही.



उमेदवार निहाय मिळालेली मतं

 जितेश अंतापूरकर – 1 लाख 8 हजार 789

 सुभाष साबणे – 66 हजार 872

 उत्तम इंगोले – 11 हजार 347

विवेक सोनकांबळे – 465

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post