मुख्यमंत्रीपदाचा चार्ज अजित पवारांकडे सोपवा...राणेंची मागणी

 

मुख्यमंत्रीपदाचा चार्ज अजित पवारांकडे सोपवा...राणेंची मागणीमुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  हे मानेच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल आहेत.त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, जवळपास एक आठवड्यापासून ते रूग्णालयात उपचार घेत आहे. यावरुनच भाजपचे नेते निलेश राणे यांनी टि्वट करीत त्यांना टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज सोपवण्याची मागणी राणेंनी केली आहे.

आपल्या टि्वटमध्ये निलेश राणे म्हणतात, ''मुख्यमंत्री आजारी आहेत तर त्यांनी किमान चार्ज डेप्युटीला दिला पाहिजे, चार्ज सोडत नाही कारण त्यांना कोणावरही विश्वास नाही. महाराष्ट्राला नावाचा ही मुख्यमंत्री नाही हे बरोबर नाही, महाराष्ट्राचे प्रश्‍न बिकट होत चाललेत, लोकांची परिस्थिती बिघडत चालली आहे, कधी तरी राज्याचा विचार करा.''

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post