कापूस उत्पादकांची दिवाळी...10 हजारांपर्यंत भाव मिळण्याची शक्यता

 

कापूस उत्पादकांची दिवाळी...10 हजारांपर्यंत भाव मिळण्याची शक्यतामुंबई : यंदा कापसाचे उत्पादन घटले असून सध्या बाजारात कापसाला मोठी मागणी आहे. व्यापारी शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करत आहेत. प्रचंड मागणी आणि वाढलेले दर यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत आनंदाची संधी मिळाली आहे. येत्या काही दिवसात कापसाचा भाव 10 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कमी उत्पादन आणि वाढती मागणी या पार्श्वभूमीवर व्यापारी कापूस खरेदीसाठी सोशल मीडियाचाही वापर करत आहेत. असे पहिल्यांदाच होत असल्याचे सांगितले जात आहे. डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर खासगी कापूस व्यापारी 8300 ते 8500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कापसाला दर देत असल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगली मागणी असली तरी यंदा अपेक्षेप्रमाणे उत्पादन आले नाही. कापूस खरेदीसाठी खासगी कापूस व्यापारी आपापसात स्पर्धा करत आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. कमी उत्पन्नामुळे खासगी कापूस व्यापारी शेतकऱ्यांना चांगला भाव देत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post