मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत खा. संजय राऊत यांनी दिली 'अपडेट'

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत खा. संजय राऊत यांनी दिली 'अपडेट'मुंबई: मान दुखण्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यात एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी दिली होती. आता खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयात आहेत. त्यांची तब्येत सुधारत आहे. काल रात्री माझी आणि त्यांची फोनवरुन चर्चा झाली. लवकरच ते घरी जातील. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आहेत त्यामुळे त्यांनी संपूर्ण बरे झाल्यानंतर कामाला लागावे. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करु नये. कारण ज्या प्रकारची शस्त्रक्रिया झाली आहे कुठेतरी लहान गोष्टीमध्ये कमतरता राहिली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील,” असे संजय राऊत यांनी म्हटले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post