विडंबन करताना तोल सुटला... 'चला हवा येऊ द्या' टीमने मागितली केंद्रीय मंत्री नारायण राणेंची माफी...

 

  विडंबन करताना तोल सुटला... 'चला हवा येऊ द्या' टीमने मागितली केंद्रीय मंत्री नारायण राणेंची माफी... मुंबई : झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय आणि आवडीने पाहिला जाणारा 'चला हवा येऊ द्या' हा मराठी शो सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या शोमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पात्र दाखवण्यात आल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला गेला. राणे समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश साबळे व त्यांच्या टीमने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत दिलगिरी व्यक्त केली.

‘चला हवा येऊ द्या’ चे सूत्रसंचालक निलेश साबळे आणि टीमने  23 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. झी टीव्ही वर नुकत्याच झालेल्या ‘दिवाळी अधिवेशन’ या कार्यक्रमात राणे यांचे हुबेहूब पात्र दाखविण्यात आले होते. या पात्रावर राणे समर्थकांनी आक्षेप नोंदविला होता. अनेक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या. परिणामी राणे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी झी टीव्ही आणि साबळे यांना फोन करून संताप व्यक्त केला होता. त्यामुळे  साबळे व टीमने राणे यांची भेट घेतली. त्यांनी राणे यांच्या अधिश या निवासस्थानी जात दिलगिरी व्यक्त केली. यावेळी आमदार नितेश राणेदेखील उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post