सत्ताधारींनी पत्नीबाबत अपशब्द वापरल्याने माजी मुख्यमंत्री भर पत्रकार परिषदेत रडले...केली मोठी भीष्म प्रतिज्ञा

 सत्ताधारींनी पत्नीबाबत अपशब्द वापरल्याने माजी मुख्यमंत्री भर पत्रकार परिषदेत रडले...केली मोठी भीष्म प्रतिज्ञाहैदराबाद: विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांनी पत्नीबाबत अपशब्द वापरल्याने तेलुगु देसम पार्टीचे नेते एन. चंद्राबाबू नायडू प्रचंड व्यथित झाले. पत्रकार परिषद सुरू असतानाच ते ढसढसा रडले. यावेळी त्यांनी जोपर्यंत सत्तेत येत नाही, तोपर्यंत विधानसभेत पाय ठेवणार नाही, असा पणच त्यांनी केला.

सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांकडून चंद्राबाबू नायडूंबद्दल सातत्याने अपशब्द वापरले जात आहेत. त्यात त्यांच्या पत्नीबद्दलही अनुद्गार काढण्यात आल्याने चंद्राबाबू प्रचंड व्यथित झाले. त्यामुळे त्यांनी जोपर्यंत सत्तेत येत नाही, तोपर्यंत विधानसभेत पायच ठेवणार नसल्याची शपथ घेतली.
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post