राजीनामा द्या. पुन्हा एकदा निवडणूक होऊन जाऊ द्या...भाजपने उध्दव ठाकरेंना ललकारले....

राजीनामा द्या. पुन्हा एकदा निवडणूक होऊन जाऊ द्या...भाजपने उध्दव ठाकरेंना ललकारले.... कोल्हापूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकरून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. 

अनिल देशमुखांचे सर्व दरवाजे बंद झाले. त्यामुळेच ते चौकशीसाठी हजर झाले, असं मी कालच बोललो होतो. सर्व सामान्य माणूस सापडत नसेल तर सर्च वॉरंट निघालं असतं. काहीजण जात्यात आहेत तर काहीजण सुपात आहे, असा सूचक इशारा पाटील यांनी दिलाय. अजित पवार यांची 12 कोटींची मालमत्ती सील करण्यात आली आहे. एकामागे एक रांग लागली आहे. मंत्रिमंडळाला आता नैतिक अधिकार उरलेला नाही. उद्धवजी… आता तरी सरकार बरखास्त करा. नैतिकता असेल तर राजीनामा द्या. पुन्हा एकदा निवडणूक होऊन जाऊद्या, असं आव्हानच पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post