आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी फुंकले आगामी निवडणुकांचे रणशिंग....केली मोठी घोषणा

 

आगामी निवडणुका भाजपच्या झेंड्याखालीच लढवायच्यानगर : श्रीरामपूर तालुक्यातील सर्व निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लढविण्याचा निर्धार व्यक्त करून, आतापासूनच बुथ कमिटीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करावी. यासाठी शहरात सुकाणू समिती नेमण्याची घोषणा माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

भारतीय जनता पक्षाच्यावतीने श्रीरामपूर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात आ. विखे पाटील यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधत आगामी निवडणुकांबाबतचे भाकितही यावेळी केले.

कोविडचे संकट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील जनतेचे प्रश्न गंभिर बनले आहेत. तीन पक्षांच्या सरकारला जनतेचे प्रश्न सोडविण्यात कोणतेही स्वारस्य राहीले नाही. जनतेचा उद्रेक रस्त्यावर येऊ नये म्हणून सरकार फक्त जनतेवर दबाव आणत आहे. प्रश्न सोडविण्याला महत्त्व देण्यापेक्षा जमावबंदी आदेश लागू करण्यातच सरकारचे महत्त्व अधिक दिसत असल्याचा टोला भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. यापुढील सर्व निवडणुका या भाजपाच्या झेंड्याखालीच लढविल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post