दिवाळीत मिठाई घेताना काळजी घ्या... नगरमध्ये तब्बल १५०० किलो बनावट खवा जप्त


दिवाळीत मिठाई घेताना काळजी घ्या... नगरमध्ये तब्बल १५०० किलो बनावट खवा जप्तनगर :  दिवाळीच्या काळात लोकं आवर्जून खव्याची मिठाई खरेदी करतात. पण काही अपप्रवृत्ती वाढलेल्या मागणीचा गैरफायदा घेत भेसळयुक्त खवा वापरून मिठाई बनवून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करतात.   पामतेल, दूध पावडर , साखर असे पदार्थ एकत्र करून तयार होणारा एक हजार 500 किलो बनावट खवा अन्न प्रशासनाने नगरमध्ये जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी शहरातील सक्कर चौकातील वाहन पार्किंग येथे ही कारवाई करण्यात आली. हा खवा गुजरात राज्यातील अहमदाबाद  येथून ट्रॅव्हल्समधून नगर शहरात आणला जात असल्याची बाब समोर आली आहे. 

 अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांच्यासह अन्नसुरक्षा अधिकारी प्रदिप कुटे, शरद पवार, नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर यांनी  ट्रॅव्हल्सची तपासणी केली तेव्हा सिटांच्या खाली व ट्रॅव्हल्सच्या पाठीमागील बाजुला गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट खव्याचा साठा आढळून आला. या खव्याची दोन लाख रूपयांपेक्षा जास्त किंमत आहे. नगरमधील योगेश खंडेलवाल, गणेश डेअरी, रामस्वरुप भाई व बारामती येथील फारूकभाई नावाच्या व्यक्तीने हा खवा मागितला होता, अशी माहिती सहायक आयुक्त शिंदे यांनी दिली. तपासणीसाठी नमुने घेऊन हा माल तत्काळ नष्ठ केला जाणार आहे. तसेच सर्व दोषींवर अन्नसुरक्षा कायद्यातंर्गत कारवाई केली जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post