आमदारकीसाठी हळद लावून बसलो पण.... प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी व्यक्त केली खंत..

 

आमदारकीसाठी हळद लावून बसलो पण.... प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी व्यक्त केली खंत..



मुंबई : महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेवर नियुक्तीसाठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावांची यादी राज्यपालांना पाठविली आहे. पण राज्यपालांनी या नावांना अजूनही मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे इच्छुकांचा हीरमोड झाला आहे. आमदारपदासाठी राष्ट्रवादी कडून शिफारस झालेले  गायक आनंद शिंदे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

जो पर्यंत गाणी गात होतो, तोपर्यंत लय चांगलं होतं. पण जेव्हा आमदारकीसाठी गेलो तेव्हा गाणही बंद झालं अन् सगळचं बंद झाले. एवढी मजा कोणीच केली नसेल, पण आमदारकीची स्वप्नं पाहिली आणि गोंधळ झाला, असे आनंद शिंदे म्हणाले.

आता हळद लावून बसलो पण तो बाबा लग्न लावून द्यायला तयार नाही,' असे म्हणत गायक आनंद शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post