बाउन्सची आकर्षक इलेक्ट्रिक स्कूटर लॉंचींगच्या तयारीत....499 रुपयांत बुकींगची संधी

 

बाउन्सची आकर्षक इलेक्ट्रिक स्कूटर लॉंचींगच्या तयारीत....499 रुपयांत बुकींगची संधीऑटोमोबाईल क्षेत्रात आता इलेक्ट्रिक वाहनांचं युग सुरु झालं आहे.  आता स्कूटर भाड्याने देणारी स्टार्टअप कंपनी बाउन्स आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर इनफिनिटी लॉन्च करणार आहे. स्कूटरचं लॉन्चिंग २ डिसेंबरला होणार आहे. यासाठी प्री-बुकिंग त्या दिवसापासून सुरू होणार आहे. बुकिंची रक्कम ४९९ रुपयांपासून सुरु होणार आहे. इनफिनिटी इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये फिचर्स ग्राहकांना आकर्षित करतील. बाउन्स इन्फिनिटीमध्ये एक स्मार्ट काढता येण्याजोगी लिथियम-आयन बॅटरी आहे. ग्राहक त्यांच्या सेवा आणि गरजेनुसार काढू शकतात आणि चार्ज करू शकतात. बाऊन्सने राजस्थानमधील भिवडी येथील उत्पादन प्रकल्पात काम सुरू केले आहे, असे कंपनीने सांगितले. या प्लांटमध्ये दरवर्षी १ लाख ८० हजार स्कूटर तयार करण्याची क्षमता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post