गुजरातच्या द्वारकेतून 350 किलो ड्रग्ज जप्त, पाकिस्तानमधून समुद्रामार्गे आली होती खेप

 मोठी करवाई! गुजरातच्या द्वारकेतून 350 किलो ड्रग्ज जप्त, पाकिस्तानमधून समुद्रामार्गे आली होती खेप


द्वारकाच्या सलयामधून गुजरात पोलिसांनी करोडोंचे ड्रग्जसह हेरॉईन जप्त केले आहे. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेला एक इसम मुंब्रा येथील असल्याची माहिती मिळत आहे.

द्वारकामधून ड्रग्जची मोठी खेप पकडल्याच्या वृत्ताला गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी दुजोरा दिला आहे. गुजरात पोलिसांचे आभार मानताना संघवी म्हणाले की, या ऑपरेशनसाठी अनेक टीम तयार करण्यात आल्या होत्या. ड्रग्जच्या गुन्ह्यात पोलिसांनी सलीम अलीकारा नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी प्रथम ड्रग्जची 19 छोटी पाकिटे जप्त केली. यानंतर आरोपीच्या घरातून 47 मोठी पाकिटे जप्त करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 50 किलो मेफेड्रोन आणि 16 किलो हेरॉईन पकडण्यात आले आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 350 कोटी रुपये आहे. पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. अंमली पदार्थांचे प्रमाण अधिक असू शकते, असे रेंज आयजींनी सांगितले.

गुजरातमध्ये सागरी मार्गाने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या या रॅकेटचा गुजरात दहशतवाद विरोधी पथक, स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष ऑपरेशन ग्रुप यांच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश झाला. द्वारकाजवळील खंभालिया येथून अमली पदार्थांचा हा साठा जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 66 किलो अमली पदार्थ पकडण्यात आले आहेत. या कारवाईत आतापर्यंत 50 किलो ड्रग्ज आणि 16 किलो हेरॉईन पकडण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक देवभूमी द्वारका यांनी सांगितले की, यापूर्वी वडीनारजवळ एका आरोपीकडून सुमारे 15 किलो पदार्थ जप्त करण्यात आला होता. यानंतर विविध ठिकाणी छापे टाकून अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.गुजरातमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून हजारो कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. सप्टेंबरमध्ये मुंद्रा बंदरातून सुमारे २१ हजार कोटींची हिरोईन पकडली गेली होती. यापूर्वी पोरबंदरमधून सुमारे दीडशे कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post