राजकीय सूड उगवण्याच्या नादात 30 कोटी रुपये शासनाला परत केले

 जिल्हा परिषदेच्या सत्ताधार्‍यांनी सातत्याने विकासकामांत राजकारण  केले आहे !! 

 जालिंदर वाकचौरे 



एकीकडे गटातील झेडपी सदस्य कामांची मागणी करत असताना, सत्ताधार्‍यांनी एकवेळ निधी मागे गेला तरी चालेल मात्र विरोधकांच्या गटात कामे होऊ द्यायची नाही, असे खालच्या पातळीचे धोरण राबविले. अशाप्रकारे सत्ताधार्‍यांनी केवळ आमच्यावर राजकीय सूड उगवण्याच्या नादात 30 कोटी रुपये शासनाला परत केले मात्र ती रक्कम विकासकामांसाठी वापरली नाही, असा मोठा आरोप जिल्हा परिषदेचे भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे.

     वाकचौरे यांनी पत्रकात म्हटले की,  शासनाने जिल्हा वार्षिक योजना 2019-20 अंतर्गत सर्वसाधारण, विशेष घटक, आदिवासी, ओटीएसपी इत्यादी विभागाच्या विकास कामांसाठी सुमारे 295 कोटी रुपयांचा निधी दिला होता. हा निधी 31 मार्च 2021 पर्यंत खर्च करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि पदाधिकार्‍यांनी तत्परतेने कामे करण्याची गरजही होती. मात्र, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे निधी असुनही अनेक कामे होऊ शकली नाही. यात, सर्वच विभागांची कामे कागदावर राहिल्याने हा निधी अखर्चित राहिला आणि तो परत करण्याची नामुष्की झेडपी प्रशासन आणि पदाधिकार्‍यांवर ओढावली. जिल्हा परिषदेने अनेक कामे हाती घेतली होती. काही कामांना कोरोनाचे ग्रहण लागल्याने ‘ती’ कामे झाली नाही, तर  काही कामे पूर्ण झाल्यानंतर त्या कामाचा शिल्लक निधी मागे दिल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. यामध्ये शिक्षण 9.5 कोटी आरोग्य 7.54 कोटी, महिला बालकल्याण 3.32 कोटी, कृषि 2.33, लघु पाटबंधारे 2.75, बांधकाम उत्तर 1.98,  बांधकाम दक्षिण 1.65 कोटी, पशुसंवर्धन 36 लाख, पाणी पुरवठा 38 लाख, नाविण्यपूर्ण योजना 71 लाख अशाप्रकारे अखर्चित निधी राहिल्याने तो शासनाकडे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने परत केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post