महानगरपालिकेच्या ‘या’ प्रभागात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर....21 डिसेंबरला मतदान

महानगरपालिकेच्या ‘या’ प्रभागात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर....21 डिसेंबरला मतदान नगर-  प्रभाग क्र.9 क  नगरसेवक श्रीपाद छिंदम  नगरसेवक पद रद्द झाल्या मुळे  महानगरपालिकेची पोट निवडणूक जाहीर झाली असून दिनांक 21 डिसेंबरला निवडणूक होणार तर आज पासून या प्रभागांमध्ये आचारसहिता जाहीर करण्यात आली आहे.या पोटनिवडणुकीमध्ये सुमारे 18 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.प्रभाग नऊसाठी २४ मतदान केंद्रांवर होणार मतदान या प्रभागात १८ हजार ३९४ मतदार आहेत. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या प्रभागातून चार नगरसेवक निवडून आले आहेत. प्रभाग ९ क मधील श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द झाल्याने ही निवडणूक होत आहे. त्यासाठी अंतिम मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post