सख्ख्या भावानेच 2 कोटी 11 लाखांना फसवले तिघांवर गुन्हा दाखल

 सख्ख्या भावानेच 2 कोटी 11 लाखांना फसवले, सेवानिवृत्त अधीक्षकांचा आरोप, तिघांवर गुन्हा दाखलऔरंगाबादः शहरातील सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक हिरासिंग भिसूजी जाधव यांना त्यांच्या सख्ख्या भावानेच तब्बल दोन कोटी रुपयांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या भावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 प्रकल्पाकरिता संपादित झालेल्या जमिनीचा मावेजा हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.


या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरासिंग जाधव यांची मूळ गाव भोसा आणि तिवरंगा येथे शेती, घर अशी मिळकत आहे. त्यांचे मोठे बंधू उत्तम जाधव, भावजय कमलाबाई, पुतवण्या नितीन यांनी अॅड. रमेश पाटील व छाया देशमुख यांच्याशी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारे नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 या प्रकल्पासाठी संपादित झालेल्या जमिनीचा दोन कोटी 11 लाख 32 हजार 764 रुपये मावेजा उचलला. यवतमाळमधील उमरखेड येथून ही रक्कम हडप केली, असे फिर्यादित म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post