विधानपरिषद निवडणुक मा.मंत्री कर्डिलेंचा फराळाच्या कार्यक्रम.... दिडसे प्लस शुभेच्छा

 बुऱ्हानगर येथे रंगला दिवाळी पाडव्याचा स्नेहमेळावा

स्नेहमेळाव्यात विधान परिषदेच्या सुमारे दीडशे मतदारांनी मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची घेतली भेट

जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी मा.मंत्री कर्डिले यांना दिल्या आमदारकीच्या शुभेच्छाअहमदनगर प्रतिनिधी - गेल्या तीस वर्षापासून बुऱ्हानगर येथे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे दिवाळी पाडव्यानिमित्त फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून स्नेहमेळावा भरवत असतात परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोविडचे संकट असल्याने मागील वर्षी हा स्नेहमेळावा भरवण्यात आला नव्हता परंतु यावर्षी रुग्णसंख्या कमी झाल्याने मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या कडून पाडव्यानिमित्त फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावर्षी विधान परिषदेची निवडणूक आली असल्याने मा.मंत्री कर्डिले यांनी ही निवडणूक हाती घेतली आहे अशी चर्चा या कार्यक्रमात रंगू लागली.नगर,पाथर्डी,राहुरी विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित होते याच बरोबर जिल्ह्यातील विधान परिषदेचे सुमारे दीडशे मतदारांनी स्नेह मेळाव्यात हजेरी लावली. मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी पंचवीस वर्ष विधानसभेचे प्रतिनिधित्व केल्यामुळे जिल्ह्यामध्ये सर्वच पक्षात त्यांचा दांडगा संपर्क आहे.त्यामुळे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली त्यामुळे भविष्यकाळात मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.खासदार सुजय विखे यांनी एका कार्यक्रमात स्पष्टपणे जाहीर केले की,कर्डिले लवकरच आमदार होणार त्यांच्या या वक्तव्यानंतर जिल्हाभर चर्चेला उधाण आले.फराळाच्या झालेल्या कार्यक्रमामध्ये माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सुजय विखे यांच्यासह विविध मान्यवरांचे तोंड गोड केले यावेळी मा.पालकमंत्री राम शिंदे,खा.डॉ.सुजय विखे,आ.मोनिका राजळे,मा.आ.बाळासाहेब मुरकुटे,पांडुरंग अभंग,उपमहापौर गणेश भोसले,मा.ज.प उपध्यक्ष सुजित झावरे,अशोक खेडकर,अंबादास पिसाळ, नामदेव राऊत,जयश्री ससाणे,विवेक कोल्हे,मा.महापौर बाबासाहेब वाकळे मा.आमदार राहुल जगताप, प्रतिभा पाचपुते,दादाभाऊ चितळकर,चाचा तनपुरे तसेच जिल्ह्यातील सामाजिक राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post