राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षांसह 14 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई...

राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षांसह 14 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई...

 


उस्मानाबाद - तुळजापूर नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्यासह इतर 14 नगरसेवकांवर कारवाई करत जिल्ह्यातील राष्ट्रवादीने यांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाच्या विरोधात काम केल्याने या नगरसेवकांना 6 वर्षाकरिता निलंबित केलं असून हे सर्व नगरसेवक हे तुळजापूर विधानसभेचे भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत काम करत होते. यात नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या सह विनोद (पिंटू) गंगणे, नगरसेविका अर्चना विनोद गंगणे, औदुंबर कदम, पंडित जगदाळे,चंद्रकांत कणे, मंजुषा देशमाने, किशोर साठे,आशाताई विनोद पलंगे,विजय कंदले,रेशमा गंगणे, वैशाली कदम,भारती गवळी, अश्विनी रोचकरी या सदस्यांना निलंबित करण्यात येत आहे.

पाटील यांच्या पक्ष बदला नंतर 2019 च्या विधानसभेपासून वारंवार पक्ष विरोधात काम करत असल्यामुळे व पक्षाच्या 2019 पासून कोणत्याही बैठकीस हजर राहिल्या नसल्यामुळे यांना निलंबित करण्यात आल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. पक्ष जिल्हा निरीक्षक रमेश बारस्कर यांच्या बैठकीत माजी आमदार राहुल मोटे,ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post