कोरोनावरील लस बनवतो सांगून डॉक्टरची 12 लाखांची फसवणूक दोघांना अटक

 कोरोनावरील लस बनवतो सांगून डॉक्टरची 12 लाखांना फसवणूक, परदेशी नागरिकासह दोघांना अटकमुंबई : कोव्हिड-19 (COVID-19) आजाराची लस (Corona Vaccine) बनवतो, असं सांगून भारतीय डॉक्टरची 12 लाखांची फसवणूक (Fraud) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी परदेशी नागरिकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. कोव्हिड-19 लसीसाठी कच्चा माल पुरवण्याच्या नावाखाली या भामट्यांनी डॉक्टरची 12 लाखांची फसवणूक केली होती.मुंबई सायबर सेलमध्ये कोरोना लसीच्या नावाखाली फसवणुकीचे नवे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी परदेशी नागरिकासह दोन आरोपींना अटक करुन लस बनवणाऱ्या बनावट कंपनीचा पर्दाफाश केला आहे. आरोपींकडून 10 मोबाईल, 2 सिमकार्ड, 1 पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.

मुंबई सायबर क्राइम ब्रँचच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी सांगितले की, “कोव्हिड-19 लसीसाठी कच्चा माल पुरवण्याच्या नावाखाली डॉक्टरची 12 लाखांची फसवणूक करण्यात आली होती. आरोपीने सांगितले होते की लंडनमध्ये त्याची एक कंपनी आहे, ज्याची आयकॉनिक फार्मास्युटिकल आहे आणि ती निर्माता आहे. जे कोव्हिड-19 रोगासाठी लस बनवते.”

भारतीय डॉक्टरने 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर सायबर सेलच्या पथकाने नायजेरियन नागरिक आणि एका भारतीय नागरिकाला अटक केली आहे. या लोकांनी आणखी अनेक लोकांची फसवणूक केली आहे का, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post