जिल्हा रूग्णालयातील आगीत 10 जणांचा मृत्यु...देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी मागणी

 जिल्हा रूग्णालयातील आगीत 10 जणांचा मृत्यु...देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी मागणीमुंबई : नगरमध्ये जिल्हा रूग्णलायातील आयसीयुला लागलेल्या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यु झाला आहे. या घटनेची माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून आगीच्या घटनेस जबाबदार असणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. फडणवीस यांनी म्हटले आहे की, नगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post