नगर जिल्हा रूग्णालयात आग...10 जणांचा मृत्यु, आकडा वाढण्याची भीती

नगर जिल्हा रूग्णालयात आग...10 जणांचा  मृत्यु, आकडा वाढण्याची भीती नगर: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आज सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण ६० ते ७० वयोगटातील आहेत.

आयसीयू कक्षामध्ये 25 जणांवर corona उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान या कक्षाला सकाळी आग लागली आणि या आगीमध्ये हे सर्व रुग्ण गंभीर भाजले. त्यामध्ये सात जण सात जण अत्यंत गंभीर असून राहिलेल्या 20 जणांना तातडीने इतर कक्षांमध्ये हलवण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन देण्याची कार्यवाही तातडीने सुरू झाली.

रामकिसन विठ्ठल हरपुडे( वय ७०),  सिताराम दगडू जाधव (८३),  सत्यभामा शिवाजी घोडचौरे( ६५)य,  कडूबाळ गंगाधर खाटीक (६५),  शिवाजी सदाशिव पवार (८२) , दीपक विश्वनाथ जेडगुले (५७),  कोंडाबाई मधुकर कदम (७०),  आसराबाई नांगरे (५८ ), छबाबी अहमद सय्यद (६५)

व एक अनोळखी. चार महिला व सहा पुरुष अशा दहा जणांचा मृत्यू

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post