जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आदर्श संस्था पुरस्कार प्रदान

 जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते  आदर्श संस्था पुरस्कार प्रदाननगर : सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला प्रतिष्ठेचा आदर्श सहकारी संस्था पुरस्कार प्राप्त झाला आहे. मुंबईतील वाय.बी.सेंटर येथे झालेल्या सोहळ्यात राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संस्थेचे चेअरमन संजय कडूस, व्हा.चेअरमन अशोक काळापहाड, व्यवस्थापक राजेंद्र पवार यांनी पुरस्कार स्विकारला. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहकाराचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे काम आदर्शवत असल्याचे सांगून संस्थेच्या पदाधिकारी, संचालकांचे अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे संचालक शशिकांत रासकर, अरूण जोर्वेकर, विलास वाघ, सोपान हरदास, इंदू गोडसे, उषा देशमुख, संजू चौधरी, सनी वागस्कर आदी उपस्थित होते. 

चेअरमन संजय कडूस म्हणाले की, नगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी सभासदाभिमुख आणि आदर्श कारभारासाठी नावाजली जाते. संस्थेला मिळालेला पुरस्कार आमच्यासाठी अभिमानास्पद असून सर्व संचालक, सभासदांचे यात योगदान आहे. 1927 साली स्थापन झालेल्या अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने उत्कृष्ट व्यवस्थापन करत जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे. सभासदांना तातडी कर्ज ऑनलाईन मंजुरी, कन्यादान योजना, शैक्षिणक कर्ज, सभासदांचा 5 लाखांचा अपघाती विमा सोसायटीने उतरविलेला आहे. सभासदाचे अपघाती निधन झाल्यास त्या सभासदाला पाच लाखाचा विमा देण्यासोबतच त्याचे संपूर्ण कर्ज माफी केले जाते. सभासदांना तत्काळ कर्ज पुरवठ थेट खात्यता आरटीजीएसद्वारे केला जातो. संस्था सभासदांना सर्वसाधारण 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. संस्थेला आयएसओ मानांकन मिळाले आहे. संस्थेला सतत ऑडिट अ वर्ग प्राप्त झालेला आहे. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post