विराट कोहली कर्णधारपद सोडताना भावूक

 विराट कोहली कर्णधारपद सोडताना  भावूकदुबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या आयपीएल कारकीर्दीतला कर्णधारपदाचा शेवटचा सामना सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध खेळला.  या आयपीएल हंगामानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचं विराट कोहलीने यापूर्वीच जाहीर केले आहे. कोहली त्याच्या कर्णधारपदाच्या शेवटच्या आयपीएल सामन्यात कोलकात्याकडून पराभूत झाला त्याचबरोबर यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून बंगळुरुचं आव्हानही संपुष्टात आलं. सामन्यानंतर विराट खूपच इमोशनल झाला होता. इतक्या वर्ष कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता फायनली तो दिवस आला, ज्या दिवशी कर्णधारपदाला अलविदा म्हणायचंय… हा क्षण विराटसाठी खूपच भावूक होता. सामन्यानंतर त्याने आरसीबी फ्रँचायजी आणि सगळ्या चाहत्यांचे आभार मानले. आतापर्यंतच्या सपोर्टबद्दल त्याने आभार व्यक्त करताना यापुढे एक खेळाडू म्हणून मी माझ्यावतीने 120 टक्के देईल, अशी ग्वाहीही दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post