आ.पवारांच्या गर्दी जमवणार्‍या स्वराज्य ध्वज कार्यक्रमावर खा.विखेंचीही टिका...प्रशासन पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप..व्हिडिओ

 आ.पवारांच्या गर्दी जमवणार्‍या स्वराज्य ध्वज कार्यक्रमावर खा.विखेंचीही टिका...प्रशासन पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप..व्हिडिओनगर : राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या अनेक नियमबाह्य गोष्टींकडे कानाडोळा करण्याचे काम प्रशासन करीत आहे. एकीकडे नगर जिल्ह्यात अनेक गावांत अन्यायकारक पध्दतीने लॉकडाउन केला जात आहे. त्याचवेळी सत्ताधारी लोकप्रतिनिधी दसर्‍याच्या दिवशी मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करून लोकांना गर्दी जमवण्याचे आवाहन करीत आहेत. हा पक्षपातीपणा असून जिल्हाधिकारीही अशा सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याचे धाडस दाखवू शकत नाहीत, अशी टिका खा.डॉ.सुजय विखे यांनी केली आहे.

नगरमध्ये आंदोलनावेळी पत्रकारांशी बोलताना खा.विखे यांनी आ.रोहित पवार यांचे नाव न घेता उद्याच्या स्वराज्य ध्वज अनावरण कार्यक्रमावेळी होणार्‍या गर्दीकडे लक्ष वेधले आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी करोना काळात अनेक निबर्ंध धाब्यावर बसवत होते. तेव्हाही प्रशासनाकडून कारवाई झाली नाही. आताही अनेक करोनाचा प्रसार होतो म्हणून बंद करण्यात येतात व दुसरीकडे सत्ताधारी आमदाराच्या मोठ्या गर्दी होणार्‍या कार्यक्रमाकडे कानाडोळा केला जात असल्याचे विखेंनी म्हटलय.

 व्हिडिओ0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post