मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात आहे....

मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात आहे...


 

नगर : लखीमपूरच्या घटनेचे समर्थन कोणीही करु शकत नाही. राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना सरकार मदत करायला तयार नाही. महाविकास आघाडीचं अपयश समोर येत असून मंत्र्यांच्या अधिका-यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येतायत. त्याचमुळे कालचा महाराष्ट्र बंद पुकारला गेला, अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात आहे. या सरकारने विश्वास गमावला आहे. आता जनताच त्यांना  त्यांची जागा दाखवून देईल, असा हल्लाबोल विखेंनी केला. 

सरकारची एवढी बदनामी झालीय की सरकारने सामान्य जनतेचा विश्वास गमावलाय. भ्रष्टाचाराची मालिका आणि सरकारचं अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. महाराष्ट्र बंद करून आपली राजकारणाची पोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे‌. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा रिमोट दुसऱ्याच्या हातात आहे. राज्य सरकारने कितीही नौटंकी केली तरी जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टिका राधाकृष्ण विखे पाटलांनी केलीय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post