‘तुमने किसी को ये बात बताई तो मै तुम्हे मार डालुंगा’ अल्पवयीन 'मुलासमवेत' अनैसर्गिक कृत्य, नगर मधील प्रकार

 सैनिकाच्या वेशातील एकाचे अल्पवयीन 'मुलासमवेत' अनैसर्गिक कृत्य, नगर मधील प्रकार

सावेडी उपनगरात १३ वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य

एक आरोपी विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नगर - नगर शहरातील सावेडी उपनगर परिसरात सैन्यदलाचा वेश परिधान करून आलेल्या एका व्यक्तीने  १३ वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना बुधवारी (दि.१३) सायंकाळी घडली आहे. यासंदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ची माहिती अशी की, बुधवारी (दि.१३) सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास सावेडी परिसरात एक १३ वर्षीय मुलगा सायकलवरून घरी जात असताना त्याला सैन्यदलाचा वेश परिधान करून आलेल्या एका व्यक्तीने आवाज देऊन ‘तेरा नाम क्या है’ असे विचारले. त्यावेळी फिर्यादी मुलाने नाव सांगितले असता आरोपीने ‘मै आर्मीवाला हू, हमारे गाडी का काम चल रहा है, मै इधर सु.... सु... कर सकता हु क्या’ असे विचारले असता फिर्यादीने त्याला होकार दिला.

त्यानंतर आरोपीने फिर्यादीला शेजारील काटवनात नेऊन अनैसर्गिक कृत्य केले. तसेच ‘तुमने किसी को ये बात बताई तो मै तुम्हे मार डालुंगा’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत संबंधीत अल्पवयीन मुलाने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी त्या अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३४१, ३७७, ५०६, पोक्सो कायदा ४,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जुबेर मुजावर करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post