नगर अर्बन बँक निवडणूक...पहिल्या दिवशी ‘यांनी’ केले अर्ज दाखल

नगर अर्बन बँक निवडणूक...पहिल्या दिवशी ‘यांनी’ केले अर्ज दाखल  नगर - नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी   स्व.दिलीप गांधी प्रणीत सहकार पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी शहर मतदार संघातून सर्वसाधारण गटातून सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात बँकेचे माजी संचालक अनिल कोठारी, राजेंद्र अग्रवाल यांच्या सह ईश्वर बोरा, राहुल जामगावकर, संपत बोरा तसेच माजी संचालक दीपक गांधी यांच्या पत्नी संगीता गांधी यांनी महिला राखीव मतदार संघातून उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या कडे दाखल केले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post