श्री तुळजा भवानी देवीच्या सेवेकरांचा बुऱ्हानगर मध्ये सन्मान; शक्तीच्या उपासकांना मानाचा मुजरा : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

 श्री तुळजा भवानी देवीच्या सेवेकरांचा बुऱ्हानगर मध्ये सन्मान

शक्तीच्या उपासकांना मानाचा मुजरा : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले 

 भगत कुटुंबियांच्या वतीने पलंग पालखीचे सेवेकरी व मानकर यांचा बुऱ्हानगर येथे उत्सव संपन्न.अहमदनगर प्रतिनिधी :बुऱ्हानगर येथील भगत कुटुंबीय यांच्या पुढाकारातून श्री तुळजा भवानी देवीच्या पलंग पालखीचे सेवेकरी व मानकरी यांचा उत्सव निमित्त सन्मान करण्यात आला. हा उत्सव इतिहासात पहिल्यांदाच होत असून याची समाजात नोंद घेण्यासारखी आहे. महाराष्ट्रातील साडेतीन पीठा पैकी एक  पूर्ण पीठ श्री क्षेत्र तुळजापूर मधील श्री तुळजाभवानी मातेची ओळख आहे. वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील कुलदैवत असलेल्या श्री तुळजा भवानी देवीच्या नवरात्र उत्सवा दरम्यान नगर जिल्ह्यातून राहुरी येथून पलंग पालखीचा शुभारंभ होतो व ही पालखी नगर व बीड जिल्ह्यातून तुळजापूर येथे रवाना होते. या दरम्यान पलंग पालखीचे सेवेकरी व मानकरी मोठ्या धार्मिक उत्साहात तुळजापूर येथे पलंग पालखी  घेऊन जात असतात.  बुऱ्हानगर येथे इतिहासात पहिल्यांदाच सेवेकरी व मानकऱ्यांचा मानसन्मान व उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करून महाराष्ट्रात अध्यात्मिक धार्मिकते मध्ये एक चांगला पायंडा भगत कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला. या पालखीचे व पलंगाचे वंश परंपरेचे सेवेकरी असलेल्या शक्तीच्या उपसाकांचा एकत्रित रित्या प्रथमच बुऱ्हानगर येथे भगत कुटुंबियांच्या वतीने पालखी व पलंगाचे सेवेकरी व मानकरी यांना सन्मान करून मानाचा मुजरा करण्यात आला असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

         श्री तुळजाभवानी देवीच्या पलंग पालखीचे सेवेकरी व मानकरी यांचा इतिहासात पहिल्यांदाच भगत कुटुंबियांच्या वतीने बुऱ्हानगर येथे उत्सव व सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,श्री तुळजाभवानीचे भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम परमेश्वर, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष कदम, माजी नगराध्यक्ष अजित दादा कदम, संजय कदम, सुधीर कदम, सुदाम भगत, सागर भगत, समाधान कदम, सचिन कदम, देविदास भगत, शिवराम भगत, संदीप भगत, निलेश भगत, मंगेश भगत, वसंत भगत, सुरेंद्र भगत, दीपक भगत, संतोष भगत, हरिभाऊ कर्डिले, अक्षय कर्डिले, रावसाहेब कर्डिले, दत्त तापकिरे,यावेळी आदी मान्यवर उपस्थित होते.

            सागर भगत म्हणाले की  श्री तुळजा भवानी देवीला भगत कुटुंबियाच्या वतीने नैवेद्य देण्याचा मान आहे. यानिमित्त पलंग व पालखीचे सेवेकरी व मानकरी  यांच्या उत्सवा निमित्त इतिहासात पहिल्यांदाच आम्ही सन्मान केला आहे व भंडाराच्या आयोजन करण्यात आले.  भगत कुटुंबियांच्या वतीने सुरू केलेली ही परंपरा यापुढील काळातही सुरू राहील असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post