नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय,थोरातांचं नाव न घेता विखे पाटलांचा टोला

नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय,थोरातांचं थेटपणे नाव न घेता विखे पाटलांचा टोला अहमदनगर : भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुन्हा एकदा महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. यापूर्वी थोरातांचं थेटपणे नाव न घेता नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय, असं विखे पाटील म्हणाले होते. त्यानंतर आता कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचा इशाराच विखे-पाटील यांनी दिलाय.

 मागच्या सरकारने दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान दिलं. मात्र, शेतकऱ्यांना अनुदान न देता दूध संघाने ते पैसे हडप केले. कोणत्या दूध संधानं किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचा इशारा विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरातांना दिलाय. विखे-पाटील म्हणाले की, संगरनेरमधील एका सहकारी दूध संघाने वर्षभर दुधाचे पैसे कापले. अन तेच पैसे रिबीट म्हणून देण्यात आले. शेतकऱ्यांचेच पैसे शेतकऱ्यांना दिले. तेश शेतकरी आता आंदोलन करणार आहेत.नगर जिल्ह्यातील मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय

नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल,’ असं सूचक वक्तव्य विखे पाटील यांनी केलं आहे. विखे पाटील यांनी कोणाचंही नाव घेतले नाही. मात्र, त्यांचा रोख महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे असल्याचं दिसून येतं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post