उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदास नकार होता ... शरद पवारांनी उकलले सत्तास्थापनेचे गुढ

उद्धव ठाकरे  यांनी मुख्यमंत्री पदास त्यांनी नकार दिला होता शरद पवारांनी उकलले सत्तास्थापनेचे गुढपुणे: आज पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी केंद्रावर सडकून टीका केली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता त्यावेळेस मीच उद्धव ठाकरेंचा हात धरत हेच मुख्यमंत्री होतील असं आमदारांच्या बैठकीत सांगितले होते, ही माहितीही पवार यांनी या पत्रकार परिषदेत दिली. 

सुरवातीला उद्धव ठाकरे नेतृत्व करण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्री पदास त्यांनी नकार दिला होता. पण आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला संधी द्यावी म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला, असं शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. त्यावेळी राज्यात आघाडी सरकार बनवण्यात माझाही सहभाग होता, ही माहिती पवार यांनी दिली. राज्यात सरकार तयार होताना मुख्यमंत्री शिवसेनाचा होईल हे सर्वांनी एकमताने मान्य केल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले.

जिथं भाजपची सत्ता नाही तिथल्या सरकारला केंद्र सरकार केंद्रीय संस्था हातात धरून त्रास देत आहे.केंद्र सरकारला सामान्य माणसांविषयी आस्था नाही. पेट्रोल- डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत म्हणत राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post