बुर्‍हाणनगर पाणी योजनेतून पाणी चोरी करणारे उपोषणाची नौटंकी करतात, राज्यमंत्री तनपुरे यांची कर्डिलेंवर टिका..व्हिडिओ

 


बुर्‍हाणनगर पाणी योजनेतून पाणी चोरी करणारे उपोषणाची नौटंकी करतात, राज्यमंत्री तनपुरे यांची कर्डिलेंवर नाव न घेता टिका..व्हिडिओ
नगर : बुर्‍हाणनगर पाणी योजना पुन्हा कार्यान्वीत करण्यासाठी मी बैठक बोलवली परंतु, बुर्‍हाणनगरचे सरपंच आले नाहीत. छोटी गावं आक्षेप घेतात की मोठी गावं जास्तीचे पाणी घेतात. त्यानुसार आता प्रत्येक गावाला मीटर बसविण्यात येणार आहे. जे या पाणी योजनेसाठी उपोषणाची नौटंकी करतात तेच पाणी योजनेतून पाणी चोरी करतात हे अनेक वेळा उघडकीस आले आहे. मी तीन वेळा ही पाणी योजना चालू करायला लावली आहे, अशी भूमिका राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मांडली. त्यांनी नाव न घेता माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या उपोषणाच्या कृतीवर टिका केली. नगर जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पाणी योजना सुरु करण्यासाठी संबंधित गावांची बैठक बोलवली. पण बुर्‍हाणनगर, नागरदेवळेचे सरंपच आले नाहीत. ते उपोषणाची नौटंकी करीत बसले अशी टिका तनपुरे यांनी केली.

व्हिडिओ


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post