भरवस्तीत दोन वयोवृद्ध महिलांच्या हत्याकांडाने खळबळ...

दोन वयोवृद्ध महिलांच्या हत्याकांडाने खळबळ... सिंधुदुर्ग : दोन वयोवृद्ध महिलांच्या हत्याकांडाने सिंधुदुर्गात एकच खळबळ उडाली आहे. सावंतवाडी शहरातील भरवस्तीत राहणारी वृद्ध महिला आणि तिचा सांभाळ करणाऱ्या दुसऱ्या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. महिलेच्या अंगावरील दागिने लंपास झाले आहेत, मात्र खुनाचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. दोन वयोवृद्ध महिलांचा निर्घृण खून करण्यात आला.  महिलेच्या अंगावरील दागिने गायब असल्यामुळे चोरीच्या उद्देशाने दुहेरी हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

खून झालेल्या महिलेचे नाव नीलिमा नारायण खानोलकर होते. तर त्याच्यासोबत असणाऱ्या केअरटेकर श्यामली शांताराम सावंत यांची सुद्धा हत्या करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांच्या नजरेत ही घटना आली. खून झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, सावंतवाडी शहरातील उभा बाजार भागात ही घटना असून सावंतवाडी शहरातील भरवस्तीत खून झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post