सावेडी उपनगर भागातील श्रीराम चौक ते पुणे बस सेवेचा शुभारंभ संपन्न

 आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सावेडी उपनगर भागातील श्रीराम चौक ते पुणे बस सेवेचा शुभारंभ संपन्न


नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे - आ.संग्राम जगताप



 नगर  - नगर शहराच्या प्रलंबित विकास कामाला चालना दिली आहे. त्यामुळे उपनगराच्या विकासाला गती मिळाली आहे.सावेडी उपनगर हे शहराचे सर्वात मोठे उपनगर झाले आहे.  नागरिकांच्या दळनवळनाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सावेडीतील श्रीराम चौक,एकविरा चौक,भिस्तबाग चौक,प्रोफेसर कॉलनी चौक,प्रेमदान चौक,पत्रकार चौक, तारकपूर ते पूना बससेवा सुरू केली आहे .ही बस सेवा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे वैभव ढाकणे यांनी पाठपुरावा केला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
         आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून राज्य परिवहन महामंडळाची श्रीराम चौक ते पुणे बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते,नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे,मा.नगरसेवक निखिल वारे,सुनील त्रिंबके,बाळासाहेब पवार, विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, अजिंक्य बोरकर,एस.टीचे विभाग नियंत्रक विजय गीते,डेपो मॅनेजर आघाव, शारदाताई लगड,संतोष ढाकणे,गणेश गोरे,राहुल सांगळे,बंटी हिवाळे,योगेश ठुबे,सतीश बारस्कर,शिवाजी पालवे,योगेश पिंपळे,शामराव गोरे,आसाराम निमसे,थोटे काका,राहुल घाणेकर,गणेश उभेदळ, रवी नाईकवाडे,प्रज्वल सोरटे तसेच परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
       एस.टीचे विभाग नियंत्रक विजय गीते म्हणले की, आज पासून श्रीराम चौकातून सकाळी सात वाजता उपनगरातील विविध भागाच्या मार्गी ही बस पुणे येथे 11 वाजता गेल्या नंतर पुन्हा ही बस पुणे येथून नगर कडे रवाना होऊन परत श्रीराम चौकामध्ये येणार आहे. 
          

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post