एक लाखांची लाच...डॅशिंग महिला पोलिस अधिकारी निलंबित

एक लाखांची लाच...डॅशिंग महिला पोलिस अधिकारी निलंबित मुंबई : मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त सुजाता पाटील   यांच्यावर निलंबनाची  कारवाई करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने  लाचखोरीच्या आरोपाखाली त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. तसेच त्यांना पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

काही दिवसांपुर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सुजाता पाटील यांना लाच घेताना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी गुन्हा नोंदवून पाटील यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने सुजाता पाटील यांची जामीनावर सुटकाही केली होती. मात्र त्यांनी केलेल्या चूकीच्या कृत्याची दखल घेत शासनाने त्यांच्या त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post