स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, तीन महिलांची सुटका

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, तीन महिलांची सुटका पुणे :   पिंपरी चिंचवड शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. वाकड परिसरात स्पा सेंटरमधील देह व्यापाराचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला. या कारवाईत सामाजिक सुरक्षा विभागाने तीन महिलांची सुटका केली. वाकडमधील इवंटी स्पा   सेंटरमध्ये हा प्रकार सुरु होता. 


याआधीही पुण्यामध्ये वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला.  पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी चौघी तरुणींची सुटका केली. तर स्पा चालक दीपक साळुंखे आणि अमित काटे या दोघा आरोपींना अटक करण्यात आली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post