‘दिवाळीनंतर फटाके फोडणार, मंत्री आणि जावयांचे घोटाळे बाहेर आणणार’ किरिट सोमय्या

 ‘दिवाळीनंतर फटाके फोडणार, मंत्री आणि जावयांचे घोटाळे बाहेर आणणार’ किरीट सोमय्यांचा इशारामुंबई - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून खळबळ उडवून देणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील नेत्यांना मोठा इशारा दिला आहे. तुम्ही लवंगी लावली मात्र मी दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. तीन मंत्री आणि त्यांच्या तीन जावयांचे घोटाळे समोर आणणार असल्याचा इशारा किरिट सोमय्या यांनी दिला आहे.

किरिट सोमय्या यावेळी म्हणाले की, दिवाळी येत आहे. दिवाळीमध्ये फटाके फोडले जातात. पण किरिट सोमय्या दिवाळीनंतर फटाके वाजवणार आहे. एक दोन नाही तर पूर्ण आठ जणांचे फटाके फोडणार आहे. दिवाळी ते देवदिवाळी या काळात एक एक करून घोटाळे उघड केले जातील. यांनी गेले १२ दिवस नौटंकी केली. मात्र आता तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे आणि जावयांचे तीन घोटाळे बाहेर काढले जातील, असा सूचक इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post