एक लाखाची लाच .... नगर जिल्ह्यातील दोन खाजगी एजंट 'एसीबी'च्या जाळ्यात

एक लाखाची लाच .... नगर जिल्ह्यातील दोन खाजगी एजंट 'एसीबी'च्या जाळ्यातयुनिट - अहमदनगर

 तक्रारदार- पुरुष,  वय - 43 रा. दाढ बु||, ता- राहाता जि.अहमदनगर

 आरोपी - 1) हबीब बाबुभाई सय्यद, वय - 52, धंदा -शेती व खाजगी एजंट, 

2) शकिल अब्बास पठाण वय-43 वर्ष. धंदा - शेती व रजिस्ट्रार कार्यालय, राहुरी  येथे एजंट.

 दोघे रा- महादेववाडी, मु.पो.   सडे, ता- राहुरी जि अहमदनगर.जि- अहमदनगर

लाचेची मागणी -1,00,000/-₹  तडजोड अंती ₹ 80,000/-

लाच स्विकारली  40,000/₹

*हस्तगत रक्कम-* 40,000/-₹

लाचेची मागणी - ता.13/10/2021

लाच स्विकारली -ता. 15/10/2021

 लाचेचे कारण -.तक्ररदार यांनी अहमदनगर येथील जातपडताळणी कार्यालयात, तिन इसमांनी खोटे जातीचे दाखले काढुन जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणे करिता अर्ज केला असलेने त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या करिता दावा दाखल केला होता. सदर दाव्याचा निकाल तक्रारदार यांचे बाजुने लाऊन देणे करिता आरोपी नं. 1 याने तक्रारदार यांचें कडे तेथील अधिकारी यांना  ₹ 1,00,000/-द्यावे लागतील असे सांगून एक लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली, त्याआधारे दिनांक 13/10/2021 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी नं. 1 याने पंचा समक्ष ₹ 1,00,000/- ची मागणी करून तडजोड अंती ₹ 80,000/- ची मागणी करून त्यापैकी अर्धी रक्कम दिनांक 15/10/2021 रोजी स्विकारण्याचे मान्य केले.

आज दिनांक 15/10/2021 रोजी हॉटेल नितीन, स्टेशन रोड, राहुरी येथे आयोजित केलेल्या लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी नं. 1 याने सदरची लाच रक्कम ₹ 40000-/ तक्रारदार यांचे कडुन स्विकारुन सदर रक्कम आरोपी नं. 2 याचे कडे दिली असता दोन्ही आरोपी यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

 सापळा अधिकारी हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि,   अ'नगर

 सापळा पथक:- पो नि.प्रशांत सपकाळे, पो ना रमेश चौधरी, पो अंमलदार, रविंद्र निमसे, वैभव पांढरे,  चालक पो हवा हरुन शेख.

*मार्गदर्शक -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

मा.श्री सतिश भामरे प्रभारी अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.

 आरोपीचे सक्षम अधिकारी -खाजगी इसम असलेने.. लागु नाही


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post