जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राहुरीत ‘यांनी’ केला राष्ट्रवादीत प्रवेश

जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राहुरीत ‘यांनी’ केला राष्ट्रवादीत प्रवेश ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचे काम नवा कायदा करून राज्य सरकारने केलेय. हा कायदा केला नसता तर ओबीसी समाजाचे आरक्षण सुरक्षित राहिले नसते. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेता आला नसता, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी राहुरी इथे केले. 

यावेळी राहुरी साखर कारखान्याचे संचालक भारत तारडे, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस नामदेव झावरे, भाजप नगरसेवक शहाजी जाधव, गोरश नाथ ठोकने, ब्राह्मणी ग्रामपंचायत सदस्य अनिलराव हुबे, गिरीराज तारडे, मनाजी सुर्यवंशी, कोंठवड उपसरपंच दिलीप म्हसे , माजी सपपंच भाऊसाहेब येवले, पोपट हारदे, निवृत्ती धनवट, सुरेश झावरे, प्रतिक झावरे, बाळासाहेब नालकर यांसह इतर पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. 

आढावा बैठकीस  राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राहुरी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, शहराध्यक्ष संतोष आघाव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post