सदिच्छा मंडळाच्या मदतनिधीतून 1000 शैक्षणिक किट घेऊन सांगली कोल्हापूरला रवाना

 सदिच्छा मंडळाच्या मदतनिधीतून 1000 शैक्षणिक किट घेऊन सांगली कोल्हापूरला रवाना   अहमदनगर प्राथमिक शिक्षक संघ(स्व.आ.शिवाजीराव पाटील प्रणित)व सदिच्छा मंडळ अहमदनगर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांना आवाहन करून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पुन्हा शैक्षणिक प्रवाहात उभे करण्यासाठी मदतीचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो शिक्षकांचे हात मदतीसाठी पुढे आले.जमा झालेल्या निधीतून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या रूपाने मदत करून पुन्हा शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे ठरले.त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य किट देण्याचे ठरले.

   नियोजनानुसार 1000 विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य किट तयार केल्या गेल्या.त्या किटची एक स्वतंत्र मालवाहू गाडी भरण्यात आली.

    आज दि.8/10/2021 रोजी जि.प अहमदनगरच्या प्रांगणातून जि.प.अहमदनगरचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे अध्यक्ष मा.श्री.प्रतापराव शेळके पाटील, जि.प.सदस्य मा. श्री.पाचारणे साहेब, नूतन शिक्षणाधिकारी(प्राथ.) मा.बी.जी.पाटील साहेब, शिक्षणाधिकारी(प्राथ.) मा.शिवाजी शिंदे साहेब,शिक्षणाधिकारी(माध्य). मा.श्री.अशोकराव कडूस साहेब,उपशिक्षणाधिकारी मा.श्री.रमजान पठाण साहेब,उपशिक्षणाधिकारी श्री.शिवाजी कराड साहेब,शिक्षणाधिकारी श्री.रामदास हराळ साहेब यांचे हस्ते श्रीफळ वाढवून सदर गाडी कोल्हापूर, सांगलीच्या दिशेने रवाना झाली.

   कार्यक्रमाच्या सुरवातीला जिल्हा नेते श्री.रवींद्र पिंपळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना,पुरबाधित भाग कसा हवालदिल झाला होता त्यांच्यासाठी शिक्षक या नात्याने आपण कशीतरी योगदान दिले पाहिजे या भावनेतून निधी जमा केला व त्यातून शैक्षणिक साहित्य देण्याचे ठरविले असे सांगितले.त्यानंतर संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.माधवराव हासे यांनी कोल्हापूर ,सांगली येथे शैक्षणिक किट वाटप कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली. तर  जिल्हा शिक्षक नेते श्री,अनिल आंधळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.तसेच सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री .नारायण राऊत यांनी दप्तर देण्यामागील हेतू विशद केला. त्यानंतर उपस्थित मान्यवर यांचा बुके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.रहिमान शेख यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

  या प्रसंगी बोलताना जि.प.उपाध्यक्ष मा. श्री.प्रतापराव शेळके पाटील म्हणाले की,संघाच्या आजच्या या उपक्रमातून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी प्रेरणा घेतली तर राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही.नक्कीच संघाचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे.तर शिक्षणाधिकारी(प्राथ.) मा.श्री.शिवाजीराव शिंदे यांनी विद्यार्थ्याची गरज शोधून संघाने योग्य मदत केली आहे.समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही त्या पाठीमागची शिक्षकांची जी भावना आहे.ती खरोखर उल्लेखनीय अशीच आहे.त्यानंतर नूतन शिक्षणाधिकारी मा.बी.जी.पाटील हे शुभेच्छा देताना म्हणाले की आपण शिक्षक आहोत ,आपण अन्नदान किंवा वस्त्रदान न करता ,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करण्याचा निर्णय घेतला,आपण सर्वजण या निमित्ताने शिक्षणदूत झालात याबद्दल आपण कौतुकास पात्र आहात. पगाराच्या प्रश्नावरही लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्यासाठी कार्यवाही केली जाईल व शिक्षकांचे पगार वेळेवर करण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाईल. अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.

   याप्रसंगी  शिक्षक बँकेचे माजी चेअरमन श्री.पांडुरंग काळे ,श्री नवनाथ तोडमल ,शिक्षक नेते श्री.राजेंद्र कुदनर,श्री.कैलास वर्पे,श्री.बाबा आव्हाड,श्री.उद्धव मरकड,श्री.शिवाजी आव्हाड तर इतर तालुक्यातून आलेले  श्री.बाबासाहेब मते,श्री.पोपटराव काळे,श्री.गहिनीनाथ पिंपळे,श्री.अशोक गडाख ,श्री.चंद्रकांत मोरे,श्री.दादाभाऊ, सोनवणे, श्री.बाळासाहेब मोरे, श्री.भाऊ घुले,श्री.राजेश बनकर,श्री.अनिल कराड,श्री.सुरेश खेडकर,श्री.भारत कोठुळे,श्री.नवनाथ काळे, श्री.सतीश चबुस्कार, श्री.नितीन जाधव ,श्री.रामकृष्ण जगताप,इत्यादी शिक्षक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post