वीज रोहित्रातील 200 लिटर ऑईलची चोरी

 नगरमध्ये वीज रोहित्रातील 200 लिटर ऑईलची चोरीनगर- नगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या निर्मलनगर परिसरात सत्कार सोसायटी येथील विजेच्या रोहित्रातून 200 लिटर ऑईलची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना बुधवारी (दि.27) पहाटे घडली.

याबाबत महावितरणचे राजेंद्र भगवान पालवे (रा.वामनभाऊ कॉलनी, निर्मलनगर, सावेडी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निर्मलनगरच्या सत्कार सोसायटी परिसरात असलेल्या विजेच्या रोहित्राचे डीओ तोडून अज्ञात चोरट्यांनी रोहित्राचे झाकण खोलून त्यामधील 200 लिटर ऑईल चोरुन नेले आहे. त्यामुळे महावितरणचे सुमारे 17 हजार रुपयांचे नुकसान झाले असून रोहित्र बंद पडल्याने परिसरातील वीज पुरवठाही खंडीत झाला. 

या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.क. 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post