अमित शाह काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष...संजय राऊत यांनी शेअर केला व्हिडिओ

 अमित शाह काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानच्या विजयाचा  जल्लोष...संजय राऊत यांनी शेअर केला व्हिडिओ 



मुंबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या संघानं १० गडी राखून विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं भारताला प्रथमच नमवलं. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात जल्लोष साजरा झाला. भारतातही काही ठिकाणी पाकिस्तानचा विजय साजरा करण्यात आला आहे. काश्मीरमध्येही पाकिस्तानचा विजय साजरा करण्यात आल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला आहे. त्यांनी या घटनेचा व्हिडीओदेखील ट्विट केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काश्मीरमध्ये असताना टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानच्या विजयाचा आणि भारताच्या पराभवाचा जल्लोष साजरा होतो. हिंदुस्तानाविरोधात घोषणाबाजी होते, ही बाब चिंताजनक आहे. केंद्र सरकारनं या घटनेची नोंद गांभीर्यानं घ्यायला हवी, असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत रस्त्यावर सुरू असलेला जल्लोष दिसत आहे. काही जण हातात झेंडे घेऊन नाचत असून काही जण फटाके फोडून आनंद साजरा करत आहेत.


केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के कश्मीर में रहते हुए पाकिस्तानी टीम की टी20 में जीत का और हिंदुस्तान की हार का इस तरह जश्न मनाया जाय और हिंदुस्तान विरोधी नारे लगाये जाएं तो यह निश्चित ही चिंता का विषय है। केंद्र सरकार को इसे गंभीरता से लेना चाहिए। जय हिंद!! वंदेमातरम!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post