आ.नवघरे यांची वादग्रस्त कृती...राणेंचा प्रहार...राष्ट्रवादीत औरंगजेबाच्या औलादी आहेत...


 

मुंबई - वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दाखल झाला. शहरात दाखल होताना ट्रकमध्येच असलेल्या पुतळ्याचे तालुक्याचे आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मात्र या वेळेचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल  झाला. दरम्यान, पुतळा समिती व सर्व राजकीय पक्षांनी एकी दाखवत आमदार नवघरे यांना समर्थन देत या व्हायरल पोस्टचा तीव्र निषेध केला आहे. मात्र, विरोधकांनी हा या घटनेवरुन राष्ट्रवादीचे आमदार नवघरे यांना लक्ष्य केलं आहे. 


भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी या प्रकरणावरुन राष्ट्रवादीवर जोरदार प्रहार केला आहे. त्यांनी व्टिटमध्ये म्हटलय, राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार राजू नवघरे या हारामखोरला भर चौकात फटके टाकले पाहिजे. राष्ट्रवादीवाल्याना मस्ती आली आहे, यांची जिरवल्या शिवाय पर्याय नाही. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा. औरंगजेबच्या औलादी आहेत ह्या पक्षात. 


राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार राजू नवघरे या हारामखोरला भर चौकात फटके टाकले पाहिजे. राष्ट्रवादीवाल्याना मस्ती आली आहे, यांची जिरवल्या शिवाय पर्याय नाही. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा. औरंगजेबच्या औलादी आहेत ह्या पक्षात.
Image

 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post