नारायण राणे यांचे नवाब मलिकांना जोरदार प्रत्युत्तर... म्हणाले...

 मुंबई : ‘नीरज गुंडे हा मागच्या सरकारचा दलाल आहे. हा दलाल माझ्यावर आरोप करतोय. ज्याच्या चेंबूरच्या घरी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट प्रवेश होता. त्या व्यक्तीचं आणि समीर वानखेडे यांचा संबंध काय?’ असा सवाल करत नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मलिकांच्या या आरोपांना आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

चेंबूरमधील तो व्यक्ती आमचा मित्रच नाही तर तो कार्यकर्ता आहे. माझं आयुष्य चेंबूरमध्ये गेलंय. तो दोन नंबर वाल्यांची चांगली माहिती देतो. भुजबळांना अटक का झाली? भुजबळ तीर्थयात्रेला गेले होते का? ते तर आता फार बोलततात, अशा शब्दात राणे यांनी मलिकांना उत्तर दिलंय. मलिक यांनी अधिवेशनात भाजपला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा हल्लाबोल केला होता. त्यावर बोलताना अधिवेशन म्हणजे काय, कुणाचे अधिवेशन, अधिवेशनात काय फासावर लटकवणार का? आमचेही 105 आहेत. समीर वानखेडेंनी काय केलं? ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची चौकशी करतात. मंत्र्यांनी हजारो कोटी कुठून आणले? भ्रष्टाचारच केला नाही, त्यामुळे लागू द्या मागे, असं म्हणत राणे यांनी वानखेडेंची पाठराखण केली.

नवाब मलिक यांनी चेंबूरमधील एका व्यक्तीचं नाव घेत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. ‘नीरज गुंडे हा मागील सरकारचा दलाल आहे, हा दलाल माझ्यावर आरोप करतोय. ज्याच्या चेंबूरच्या घरी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला मिळायचं. सगळ्या विभागाच्या सेक्रेटरींच्या ऑफिसमध्ये याचं जाणं येणं होतं. वर्षावर हा कायम फिरत असायचा. रश्मी शुक्लाच्या प्रकरणात देखील गोंधळ घालत होता. महापालिकेत वारंवार जात होता. हाच दलाल आता समीर वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन तासनतास बसत असतो. हा तिथं का बसत असतो? त्याच्या मागे एक कारण आहे. कारण काशिफ खान, मोहित कंबोज, कॉर्डियला क्रूझ याचा एकमेकांशी संबंध आहे. ही बाब मी लवकरच समोर आणणार आहे. त्यानंतर भाजपच्या लोकांना राज्यभरात तोंडं दाखवायची लायकी उरणार नाही’, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केलाय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post