"मी देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर...नारायण राणेंचं मोठं विधान

 "मी देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर...", सेनेला डिवचताना नारायण राणेंचं मोठं विधानराज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारकडून मान राखला जात नसल्याची राणेंची टीका
सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्या केलं जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन सोहळा होणार आहे. त्याआधी नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. चिपी विमानतळाच्या कामात शिवसेनेनं श्रेय घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण विकास प्रकल्पांना यांच्याच नेत्यांनी याआधी विरोध केला आहे. आधी विरोध करायचा आणि प्रकल्प पूर्ण झाले की श्रेय घ्यायला यायचं, ही शिवसेना नेत्यांची वृत्ती असल्याचं नारायण राणे म्हणाले.  

राज्य सरकारनं चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवरही राणे यांनी निशाणा साधला. निमंत्रण पत्रिकेत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख नसल्याचा निषेध राणे यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षनेत्याचं नाव छापलेलं नाही याबाबत फडणवीसांशीही बोलणं झाल्याचं राणेंनी यावेळी सांगितलं. फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेवरही राणेंनी मिश्किल टिप्पणी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post