कंटेनरखाली चिरडून मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू

 कंटेनरखाली चिरडून राळेगणसिद्धीच्या मायलेकांचा दुर्दैवी मृत्यूपुणे अहमदनगर महामार्गावर श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथे भरधाव कंटनेर दुचाकीवर उलटल्याने कंटेनरखाली दबून झालेल्या अपघातात राळेगण सिद्धी (ता .पारनेर)येथील आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सकाळी ६ .३० वाजता ही दुर्घटना घडली.

पुण्याच्या दिशेने भरधाव जाणारा कंटेनर दुभाजक तोडून नगर रोडवर पलटी झाला. शिरूरवरून दुचाकीवर स्वप्नील उर्फ बंडू बाळू मापारी ( वय २७ ) व त्यांची आई लक्ष्मीबाई बाळू मापारी ( वय ६२ ) हे राळेगण सिद्धीला घरी परतत होते, पण अचानक दुभाजक तोडून कंटेनर ( एम एच ४६ – ए एफ ०२७२ ) थेट त्यांच्या अंगावरच पलटी झाला. त्यात स्वप्नील मापारी व लक्ष्मीबाई मापारी हे मायलेक कंटेनरखाली दबले गेल्याने दोघांचाही अंत झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post