नगर शहरात हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा...तीन महिलांची सुटका

 अहमदनगर शहरात एकाच वेळी दोन ठिकाणी हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा

नगर शहराचा चार्ज घेताच DySP संदीप मिटके यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन पीडित परप्रांतीय (बंगाली )महिलांची सुटका तीन आरोपी अटक नगर :  दि.  25 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना अहमदनगर शहरातील वाणीनगर तसेच केडगाव मध्ये अंबिका नगर येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे  तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील वाणी नगर, तसेच कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील अंबिका नगर केडगाव परिसरात बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन  3 पिडीत परप्रांतीय (बंगाली) महिलांची सुटका करण्यात आली आहे. 

Psi समाधान सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी 1) दीपक एकनाथ लांडगे वय 30, 2)  सागर जाधव या

 आरोपी विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन  येथे   गुन्हा दाखल करण्यात आला असून एका पीडित परप्रांतीय ( बंगाली) महिलेची सुटका करण्यात आली.

पोलीस नाईक शाहिद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी योगेश पोपट ओव्हाळ रा. माळीवाडा अहमदनगर याच्या विरुद्ध  कोतवाली पोलिस स्टेशन येथे  गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 2 पीडित परप्रांतीय ( बंगाली) महिलेची सुटका करण्यात आलेली आहे.

 एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्याची अहमदनगर जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. या दोन्ही कारवायांची वैशिष्ट्य म्हणजे उच्चभ्रू वस्तीमध्ये भाड्याने फ्लॅट  घेऊन महिलांकडून हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता.अहमदनगर शहरामध्ये बऱ्याच काळानंतर या प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमुळे अहमदनगर शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. 

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, मा. डॉ. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली Dy.s.p संदीप मिटके , PI संपत शिंदे, PI. गडकरी P.s.i. समाधान सोळंकी, स.फौ. राजेंद्र आरोळे ,पो.हे.का सुरेश औटी पो.कॉ. तरटे, अमोल शिरसाट, चेतन मोहिते, गौतम सातपुते, सचिन जाधव, शाहिद शेख, विष्णू भागवत, सुमित गवळी, दीपक रोहकले, LPC जयश्री सुद्रिक, LPC प्रियंका भिंगरदिवे आदींनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post