तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल..

 मुळा एज्युकेशन मध्ये नोकरीस असलेल्या तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी संस्थेच्या संबंधित सातजनां विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल..
अहमदनगर-प्रतीक बाळासाहेब काळे या 27 वर्षीय तरुणाने काल शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील हॉटेल सुवर्णज्योत नजीक वांबोरी फाट्या नजीक शेतामध्ये लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत आत्महत्या केलेल्या प्रतिकची बहीण प्रतीक्षा काळे हिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रतीक नोकरीस असलेल्या मुळा संस्थेशी निगडित सात जनांविरोधात प्रतिकला आत्महत्येस प्रवृत्त केले अशी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सातजनां विरोधात आईपीसी कलम 306 नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्या बाबत गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल असलेल्यात 1)व्यंकटेश नामदेव बेल्हेकर 2)विनायक दामोदर देशमुख 3)राहुल जनार्दन राजळे 4)महेश गोरक्षनाथ कदम 5)जगन्नाथ कल्याण औटी 6)रावसाहेब भीमराव शेळके 7)रितेश बबन टेमक यांची नावे असून ही सर्व मुळा संस्थेशी निगडित असल्याचे समजते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post