सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा,पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर

 सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा,पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेरबीड: ठाकरे सरकार पडणार असल्याच्या तारखा देणाऱ्या भाजप नेत्यांना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा, असा घरचा आहेरच पंकजा मुंडे यांनी दिला.


सावरगावच्या भूमीतून पंकजा मुंडे यांची तोफ प्रचंड धडाडली. अत्यंत अवेशात आणि आक्रमकपणे पंकजा मुंडे यांनी आपले मुद्दे मांडले. हे मुद्दे मांडतानाच त्यांनी थेट स्वपक्षीयांनाही जोरदार टोले लगावले. सरकार पडणार की नाही पडणार यातून बाहेर पडणार की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतो सरकार पडणार आणि सत्ताधारी म्हणतात सरकार पडणार नाही. आता यातून बाहेर पडा. विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत लक्ष घाला, असा घरचा आहेरच पंकजा यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post