नगर शहरात चोर्‍यांचे सत्र ...पाईपलाईन रोडवर दुकान फोडले

 नगर शहरात चोर्‍यांचे सत्र ...पाईपलाईन रोडवर दुकान फोडलेनगर- सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवर संदेशनगर परिसरात बेकरीचे दुकान फोडून 11 हजार 500 रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना गुरुवारी (दि.28) पहाटे घडली.

याबाबत शंकर पाटीलबा पवार यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवार यांचे संदेशनगरच्या नामदेव चौकात कनक फुडस्‌ नावाचे बेकरी उत्पादनांच्या विक्रीचे दुकान आहे. बुधवारी (दि.27) रात्री 8.30 च्या सुमारास ते दुकान बंद करुन घरी गेल्यानंतर पहाटेच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे लॉक तोडून दुकानात प्रवेश करत ड्राव्हर मधील 11 हजार 500 रुपयांची रोकड चोरुन नेली. तसेच या दुकाना शेजारी असलेल्या श्रीराम मेडीकल या दुकानाचे शटरचे लॉक तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि.क. 457, 380, 511 अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post