नगर तालुक्यातील'या'पतसंस्थेत ४ कोटींचा अपहार... संचालक मंडळावर कारवाईची मागणी

 नगर तालुक्यातील'या'पतसंस्थेत ४ कोटींचा अपहार... संचालक मंडळावर कारवाईची मागणीअहमदनगर : -  नगर तालुक्यातील भोरवाडी येथील पद्मावती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थाने चार कोटी रुपायाचा गैरव्यवहार केला आहे या संचालक  मंडळावर कार्यवाही करावी याबाबतचे निवेदन 

पद्मावती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे ठेवीदार यांनी पोलीस अधिक्षक यांना दिले आहे .

 पद्मावती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित भोरवाडी ता.जि.अ.नगर चे ठेवीदार विनंती अर्ज करीतो की, भोरवाडी, ता. नगर, जि. अहमदनगर येथील वरील पतसंस्थेचे ठेवीदार आहोत. सदर पतसंस्थेमध्ये ४ कोटी रुपयांचा आर्थीक गैरव्यवहार झालेला असल्याने संबंधीत संचालक मंडळावर कारवाई करणेबाबत मा. लेखापरीक्षक, अहमदनगर यांनी नगर तालुका पोलिस स्टेशनमध्ये दिनांक १६/०६/२०२० रोजी गुन्हा दाखल केलेला होता. त्यांवर संचालक मंडळाने अहमदनगर येथील सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केलेला होता. सदरचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केलेला असून त्यांवर परत संचालक मंडळाने मा. मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी अपिल दाखल केलेला होते. मा औरंगाबाद खंडपीठाने सदरचे अपील १८ फेब्रुवारी २०२१ रोजी रद्द केलेले असून संबंधीत संचालक मंडळावर कारवाई करणेबाबतचे आदेश दिलेले आहेत. सदरचे पतसंस्थेमध्ये भोरवाडी, कामरगांव ता. नगर येथील गोरगरीब, कष्टकरी तसेंच सेवा निवृत्त सैनिकांनीही ठेवी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त सैनिक व गोरगरीबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. याबाबत सदरचे संचालक मंडळावर पुढील कायदेशिर कारवाई करणेबाबत मा. उपअधिक्षक आर्थीक गुन्हे अन्वेशन शाखा अहमदनगर यांचे कार्यालयाकडे दिनांक २२/०२/२०२१ रोजी विनंती अर्ज दिलेला आहे. परंतू सदरचे अर्जावर कोणतीही कार्यवाही नसल्याने परत दिनांक १४/०७/२०२१ रोजी आपले कार्यालयास विनंती अर्ज दिलेला होता. परंतू अद्दयापपर्यंत संचालक मंडळावर कोणतीही कारवाई झालेली नाही. सदरचे संचालक मंडळामध्ये दोन संचालक हे शासकीय नोकरीत आहेत. सदर कर्मचारी हे रोज ड्युटीवर असतांना पोलिसांना ते आरोपीही अटक होत नसल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनाच आरोपींना अटक करण्याची इच्छा नसल्याचे ठेवीदारांचे मत झालेले आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी गावामध्ये रात्रीचे वेळी येतात व गावाच्या शिवेवरच गाडीचा सायरन वाजवण्यास सुरुवात करतात त्यामुळे आरोपी पळूज जात आहेत त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवरच संशय निर्माण झालेला आहे. सदर ठेवीदारामध्ये देशाच्या सिमेवर रात्रंदिवस पाहारा देणाऱ्या सैनिकांचे

पैस डिपॉझिट केलेले त्याच सैनिकांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी आपणास विनंती की, आम्ही कष्टाने व रात्रंदिवस सिमेवर पहारा देऊन मिळविलेल्या पैशाचा आम्हाला उपभोग घेता येत नसून आमचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी संबंधीत संचालक मंडळावर लवकरात लवकर पुढील कायदेशिर कारवाई करण्यात यावी, व आमच्या ठेवी आम्हास मिळाव्यात. या निवेदनावर

सुभद्रा कार्ल, ज्ञानदेव कार्ल, रामदास कातोरे , लक्ष्मण गुंजाळ , वैशाली कुसळ कर , गोरख जाधव , राजेंद्र बोरकुले ,शोता राम बुरकले, जनार्धन भोर , सह आदि ठेवीदारांच्या सह्या आहेत .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post